प्रतिकात्मक छायाचित्र
पुणे: राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याअनुशंगाने अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तात्पुरते कारागृह घोषित करणेसाठी केलेल्या विनंती नुसार कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
दरम्यान, कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहात नव्याने दाखल होणारे बंद्यांना तात्पुरते क्वॉरंटाईन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह , प्रेस कॉलनी समोर, येरवडा पुणे -6 या इमारतीत तात्पुरते कारागृह घोषित करण्यात आले आहे. तसेच या इमारतीत नव्याने दाखल होणार्या बंद्यांना क्वॉरंटाईन करणेसाठी तात्पुरत्या कारागृहासाठी पुढील आदेशापर्यंत अधिग्रहीत करीत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
पोलिस आयुक्त, पुणे शहर यांनी सदर तात्पुरते कारागृहाचे ठिकाणी सुरक्षेकरीता आवश्यक तो पोलीस बंदोबस्त 24 तास पुरविण्याचे तसेच तात्पुरते कारागृह येथे दैनंदिन कामकाजासाठी एक तुरुंगाधिकारी व एक लिपीक, रक्षक यांची नियुक्ती अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे यांनी करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.