# बारावीच्या निकालात कोकणची बाजी- निकाल 95.89; औरंगाबाद सर्वात कमी- 88.18 टक्के

पुणे:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी – मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के लागला असून यंदा देखील निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.88 टक्के तर मुलांचा निकाल 88.4 टक्के लागला आहे. यंदा निकाल 4.78 टक्क्यांनी वाढला आहे.  दरम्यान, यंदा निकालात कोकण विभाग अव्वल असून निकाल 95.89 टक्के तर औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी 88.18 टक्के निकाल लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येईल. विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत www.mahresult.nic.inwww.hscresult.mkcl.org आणि  http://www.maharashtraeducation.comया संकेतस्थळांवर निकाल पाहू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना यावरून गुणपत्रिकेची प्रिंटआऊटही घेता येणार आहे.

यावर्षी परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण 14,20,575 नियमित विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी 14,13,687 विद्यार्थी प्रविष्ट झाले व त्यापैकी 12,81,712 उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 90.66 आहे. तर 9 विभागांच्या सर्व शाखांमधून एकूण 86,739 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 86,341 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट बसले. त्यापैकी 33,703 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 39.3 टक्के आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 93.57 टक्के लागला आहे.

यंदा कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून कोकणचा निकाल 95.89 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा असून 88.18 टक्के इतका आहे.

विभागीय मंडळनिहाय निकाल: 

पुणे : 92.50 टक्के
नागपूर : 91.65 टक्के
औरंगाबाद : 88.18 टक्के
मुंबई : 89.35 टक्के
कोल्हापूर : 92.42 टक्के
अमरावती :92.09 टक्के
नाशिक : 88.87 टक्के
लातूर : 89.79 टक्के
कोकण : 95.89 टक्के

यंदा कला शाखेचा निकाल 82.63 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 91.27 टक्के, विज्ञान शाखेचा निकाल 96.93 टक्के तर एमसीव्हीसीचा निकाल 86.07 टक्के इतका लागला आहे.

गुण पडताळणीसाठी 27 जुलैपर्यंत अर्ज करता येणार: 17 ते 27 जुलै या कालावधीत गुण पडताळणीसाठी, तर 17 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *