# उद्या गुरूवारी बारावीचा निकाल; खालील लिंकवर पाहता येईल ऑनलाईन रिझल्ट.

पुणेः  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावीचा निकाल गुरूवार, १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाने याबाबत आज निवेदनाद्वारे घोषणा केली आहे.

परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी विषयनिहाय मिळवलेले गुण त्यांना बोर्डाच्या वेबासाइटवर पाहता येणार आहेत. तसेच निकालाची प्रिंटऑऊटही काढता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल www.mahresult.nic.inwww.hscresult.mkcl.org ; www.maharashtraeducation.com
या वेबसाइटवर पाहता येईल. दुपारी १ वाजेनंतर या लिंकवर बारावीचा निकाल उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना संपादित केलेले विषयनिहाय गुण पहायला मिळतील. तसेच गुणपत्रिकेची प्रिंटआऊटही घेता येणार आहे. यंदा बारावीची परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटामुळे उत्तरपत्रिका तपासण्यास उशीर झाल्याने त्याचा परिणाम निकाल जाहीर करण्यावर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *