# वर्षा ठाकूर, विजयकुमार फड यांच्यासह 23 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना आयएएस.

मुंबई: वर्षा ठाकूर, विजयकुमार फड यांच्यासह राज्यातील 23 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) ही रँक मिळाली आहे. यासंदर्भातील नोटिफिकेशन केंद्र सरकारचे अंडर सेक्रेटरी पंकज गंगवार यांनी जारी केले आहे.

राज्य शासनाच्या प्रशासकीय सेवेतून पदोन्नतीने आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये यू.ए. जाधव, विजयकुमार फड, कान्हू बघाटे, भाऊसाहेब दांगडे, किसन जावळे, शामसुंदर पाटील, दिलीप स्वामी, संजय चव्हाण, सिध्दराम सालीमठ, रघुनाथ गावडे, किशोर तावडे, प्रमोद यादव, कविता द्विवेदी, सुधाकर तेलंग, मंगेश मोहिते, शिवानंद टाकसाळे, राजेंद्र क्षीरसागर, प्रवीण पुरी, विनय मून, प्रदीपकुमार डांगे, वर्षा ठाकूर, डाॅ. अनिल रामोड, सी.डी. जोशी या 23 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *