औरंगाबाद: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) शहर शाखेच्या (वुमन विंग) अध्यक्षपदी डाॅ. उज्जवला दहिफळे यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी डॉ.वंदना काबरा, सचिवपदी डॉ. शिल्पा आसेगावकर, सहसचिवपदी डॉ.प्रतिमा भाले, कोषाध्यक्षपदी डॉ. अंजली गाडे यांची निवड झाली आहे.
कार्यकारी सदस्य मंडळावर डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. अर्चना भांडेकर, डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. अपर्णा रंजलकर, डॉ. अपर्णा राऊळ, डॉ. संहिता कुलकर्णी, डॉ. स्वाती शिंदे, डॉ. मयुरा काळे, डॉ. कुंदा धुळे, डॉ. वर्षा वैद्य व डॉ. उज्ज्वला खाडे यांची निवड झाली आहे.