# राज्यात महाराजस्व अभियान प्रभावीपणे राबवा.

मुंबई: राज्यात महाराजस्व अभियान प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना योग्य त्या सोयी सुविधा सक्षमतेने पुरवाव्यात असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे दिले. महसूलमंत्री श्री.थोरात यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्य प्रणाली (व्हीसीद्वारे) सर्व सहा विभागांचा आढावा घेतला.

यावेळी अपर मुख्य सचिव (महसूल) डॉ.नितीन करीर, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव व आर.व्ही. गमे, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, राजीव निवतकर तसेच उपआयुक्त मनोज रानडे उपस्थित होते.

आढाव्यानंतर मार्गदर्शन करताना श्री.थोरात म्हणाले, कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे महसूल विभागाची यंत्रणा व्यग्र असल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी महसूलच्या मूळ कामाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी. महसूल विभागाच्या कामकाजात प्रशासकीय व क्षेत्रीय कामांच्या सुधारणावर (Reforms) भर द्यावा असेही त्यांनी सूचित केले. या वेळी त्यांनी महसूल विभागातील गौण खनिज, बिन शेती, ई-फेरफार, ई-ऑफिस याविषयांबाबतची प्रगती याबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन केले.

तलाठी संघटनेशी चर्चा:
महसूलमंत्री श्री.थोरात यांनी तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या वेळी मंत्रालयीन उपसचिव, तसेच कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *