बॉम म्युझिक स्कुलचे ५ नोव्हेंबर ला अंबाजोगाईत उद्घाटन

अंबाजोगाई: संगीत क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान मिळवून शहरातील संगीतप्रेमी मुलांना पिढीजात संगीत वाद्यांसह उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसीत झालेल्या संगीत वाद्यांचे आधुनिक पद्धतीने शिक्षण देणारी बॉम म्युझिक स्कुल या पहिल्या म्युझिक स्कुलचे उद्घाटन ५ नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

अल्पावधीतच संगीतातील उच्च शिक्षण घेऊन अंबाजोगाई शहराचे नाव संगीत क्षेत्रात संपूर्ण देशभरात  पोहोचवणाऱ्या प्रख्यात संगीतकार ए. आर. रहेमान यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे उच्च शिक्षण घेवून संगीत क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केलेल्या ओंकार सत्येंदु रापतवार याने अंबाजोगाई शहरात ही अत्याधुनिक संगीत स्कुल सुरु करण्याचे धाडस केले आहे. येथील छत्रपती संभाजी राजे चौकात उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक बॉम म्युझिक स्कुलचे उद्घाटन ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार संजय दौंड, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, ज्ञानप्रबोधिनी चे प्रसाद चिक्षे, प्रख्यात संगीत शिक्षक तथा तबला अकादमीचे संचालक प्रकाश बोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओंकार रापतवार यांची आई कल्पना आणि आजी चंद्रकला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक ओंकार सत्येंदु रापतवार, वैभवी सत्येंदु रापतवार आणि रापतवार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *