पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भरमसाठ शुल्कवाढीविरोधात (विद्यापीठ विभाग, महाविद्यालये) व इतर मागण्यांच्या अनुषंगाने विद्यार्थी आणि संघटना यांचे बेमुदत घंटानाद आंदोलन भर पावसात सुरू आहे. सर्व विद्यार्थी, पालक, संघटना, पक्ष यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यासाठी आज मंगळवारी भर पावसात शुल्कवाढ जनजागृती रॅली काढण्यात आली, तर उद्या बुधवार, १३ जुलै रोजी विद्यापीठ बंद करण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आंदोलक विद्यार्थ्यांनी केले आहे.