नवी दिल्ली: जानेवारी 2020 पासून कोविड -19 विरुद्ध चाललेल्या लढाईत भारताने नवा उच्चांक गाठला आहे. एकूण चाचण्यांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली असून आज 4 कोटींचा टप्पा पूर्ण झाला.
केंद्र सरकारने केलेल्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात राबविल्याने भारताने 4,0406,6609 कोविड चाचण्या पूर्ण करून एक नवा महत्त्वाचा मापदंड स्थापन केला. जानेवारी 2020 मधे पुण्यातील प्रयोगशाळेत केवळ एका चाचणीने सुरुवात करत 4 कोटी चाचण्या पूर्ण करत भारताने लांबवरचा पल्ला गाठला आहे.
एका दिवसात पूर्ण करण्याच्या चाचण्यांतही वाढ झाली आहे. 10 लाख लोकांच्या चाचण्या एका दिवशी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आधीच गाठले असून गेल्या 24 तासांत 9,28,761 चाचण्या केल्या गेल्या. टीपीएम म्हणजे टेस्ट्स पर मिलियन वाढलेल्या असून त्यात 29,280ची वाढ झाली आहे. अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातही चाचण्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे अखेरीस पॉझिटीव्हिटीचा दर घटेल. राष्ट्रीय पॉझिटीव्हिटीचा दर कमी झाला असून तो 8.57%आहे. त्यात सतत घट होत आहे.
भारताने विशिष्ट उद्देशाने कोविड व्यवस्थापनासाठी टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट (चाचणी करा, मागोवा ठेवा, उपचार करा) हे धोरण आखून चाचणी हा सुरवातीचा आणि महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे ओळखले. आक्रमकरित्या चाचण्या केल्याने पॉझिटिव्ह रूग्ण लवकर ओळखला जातो आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा त्वरित मागोवा घेऊन त्यांना अलग करून वेळेवर आणि परिणामकारक उपचार देऊन गृह विलगीकरणात ठेवण्याचे किंवा रुग्णालयात भरती करणे निश्चित करता येते.
प्रयोगशाळांचे जाळे वाढवून, चाचण्या करण्यात सुलभता आणण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रीय चाचण्यांच्या दरात वाढ झाली. देशात 1576 प्रयोगशाळा असून त्यातील 1002 सरकारी तर 574 खाजगी आहेत. त्या याप्रमाणे: रिअल -टाईम RT PCR आधारित प्रयोगशाळा: 806 (सरकारी: 462 + खाजगी: 344)
ट्रू नॅट आधारित प्रयोगशाळा: 650 (सरकारी: 506 + खाजगी: 144)
सीबीनॅट आधारित प्रयोगशाळा: 120 (सरकारी: 34 + खाजगी: 86)
कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी /माहिती हवी असल्यास कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्या: https://www.mohfw.gov.in/ and @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असेल तर, technicalquery.covid19@gov.in या ईमेल आयडीवर साधावा आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी: ncov2019@gov.in आणि @CovidIndiaSeva.
कोविड-19 संदर्भात इतर माहिती साठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (टोल फ्री) किंवा सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या हेल्पलाईनची यादी सोबत जोडली आहे.
https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf.