# भारतीय अस्थिरोग संघटनेचा जनजागृती सप्ताह; 1 ते 7 ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रम.

जालना: भारतीय अस्थिरोग संघटनेच्यावतीने दरवर्षी 4 ऑगस्ट हा दिवस अस्थिरोग दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी एक वेगळा विषय घेऊन संघटनेचे जवळपास पंधरा हजार सभासद भारतामध्ये जनजागृती आणि आरोग्य शिक्षणाचे कार्य करत असतात यावर्षी भारतीय अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र मिना (जयपूर) आणि सचिव डॉ. अतुल श्रीवास्तव (आग्रा) यांच्या नेतृत्वाखाली देशभरात एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा सप्ताह अस्थीरोग सप्ताह म्हणून पाळला जात आहे. यानिमित्ताने वयोमानाप्रमाणे होणारी हाडाची झीज (degenarative diseases) आणि त्यामुळे येणारे अपंगत्व (Deformity) या विषयावर जनजागृती करून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक कार्यक्रम न घेता विविध समाज माध्यमांचा उपयोग करून या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम, संतुलित वजन तसेच कॅल्शिअम आणि व्हिटॅमीन डी यांचे शरीरात योग्य प्रमाण यासोबतच सांध्याला आणि हाडाला होणाऱ्या इजा कमी करणे आणि इजा झाल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे यामुळे येणारे अपंगत्व (Deformity) टाळता येते आणि ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य होते. महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजित शिंदे (सांगली) आणि सचिव डॉ. नारायण करणे (पुणे) तसेच माजी सचिव डॉ. प्रकाश सिगेदार (जालना) आणि सर्व कार्यकारिणी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये संघटनेचे दोन हजार सभासद लोकांमध्ये जनजागृतीचे काम करणार आहेत. Facebook live, webinars यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *