# जालना-मुंबई-जालना जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस 14 फेब्रुवारीपासून.

नांदेड: प्रवाशांच्या सुविधे करिता दक्षिण मध्य रेल्वे आणखी एक विशेष गाडी चालवत आहे. गाडी संख्या 02271/02272  जालना-मुंबई-जालना जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस दिनांक 14 फेब्रुवारी, 2021 पासून प्रवाशांच्या सेवेत सुरु होत आहे. ही गाडी संपूर्ण आरक्षित आहे.  अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही.

या गाडीच्या वेळा पुढील प्रमाणे:

1.गाडी संख्या 02271 मुंबई सीएसटी ते जालना जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस: ही गाडी दिनांक 14 फेब्रुवारी पासून सीएसटी. मुंबई येथून दुपारी 12.10 वाजता सुटेल आणि मनमाड (04.50), औरंगाबाद (06.30) मार्गे जालना येथे 07.45 वाजता पोहोचेल.

2.गाडी संख्या 02272 जालना  ते  मुंबई सीएसटी. जनशताब्दी विशेष एक्स्प्रेस: ही गाडी दिनांक 14 फेब्रुवारी पासून जालना येथून रोज सकाळी 08.30 वाजता सुटेल आणि औरंगाबाद (09.20), मनमाड (11.20) मार्गे सीएसटी. मुंबई येथे दुपारी 04.20 वाजता पोहोचेल.

या गाडीस 22 डबे असतील. ही गाडी संपूर्ण आरक्षित आहे.  अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *