# जायकवाडी 99.44% भरले; एक लाख क्युसेकने पाणी सोडण्याची शक्यता.

गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

औरंगाबाद: जायकवाडी धरणातील पाणीसाठा आज 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 99.44% इतका झालेला आहे. त्यामुळे ऊर्ध्व भागातील धरणातून व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक दर तासी वाढत असल्याने जायकवाडी प्रकल्पाच्या सांडव्यामधून गोदावरी नदीपात्रात 100000 क्युसेक विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. यासाठी गोदावरी नदीकाठावरील गावांना सतर्क रहावे असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथनगर उत्तर पैठणचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक दर तासी काही प्रमाणात वाढत आहे या बाबीचा विचार करता धरणात येणाऱ्या पाण्याची आवक अशाच पध्दतीने वाढत राहिली तर यापुढे कोणत्याही क्षणी जायकवाडी प्रकल्पाच्या सांडव्यामधून गोदावरी नदीपात्रात 100000 क्युसेक विसर्ग सोडण्याची कार्यवाही करण्यात येवू शकते. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होईल. तेव्हा गोदावरी नदीकाठच्या गावांना या जाहीर आवाहनाव्दारे सूचित करण्यात येते की नदीपात्रातील चल मालमत्ता, चीज वस्तू, वाहने, जनावरे, पाळीवप्राणी, शेती आवजारे व इतर साधने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे व नदीपात्रात कोणीही जावू नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असेही कळविण्यात आले आहे.

जायकवाडी प्रकल्प सद्यस्थिती:
दिनांक: १८/०९/२०२०
जायकवाडी प्रकल्प (नाथसागर)- सकाळी०६:०० वाजताची स्थिती
१)धरणाची पाणी पातळी:
१५२१.९० फुटामध्ये
२)धरणाची पाणीपातळी: ४६३.८७५मीटरमध्ये
३)आवक (मागील २४ तासाची आवक): ३७६६२क्युसेक
४)एकूण पाणी साठा: २८९७.१००दलघमी
५)जिवंत पाणीसाठा: २१५८.९९४दलघमी
६)धरणाची टक्केवारी: ९९.४४%
७)उजवा कालवा विसर्ग: ३००क्युसेक
८)पैठण जलविद्युत केंद्र: ०.०क्युसेक
९)पैठण डावा कालवा: ०.००क्युसेक
१०)सांडवा विसर्ग: ९४३२०क्युसेक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *