जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वात अंबाजोगाईत आंदोलन
अंबाजोगाई: कोविड 19 साथरोगामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत JEE/ NEET या परीक्षा घेण्यात येऊ नयेत, यासाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीने राजकिशोर मोदी यांचे नेतृत्वाखाली शुक्रवार, 28 ऑगस्ट रोजी आंदोलन केले. तसेच उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई यांचे मार्फत पंतप्रधान यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्राप्त सुचनेनुसार कोविड 19 साथरोगामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत JEE/ NEET या परीक्षा घेण्यात येऊ नयेत यासाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीने राजकिशोर मोदी यांचे नेतृत्वाखाली आज शुक्रवारी ” रद्द करा, रद्द करा… JEE/ NEET या परीक्षा रद्द करा” या आशयाचे फलक झळकावत आंदोलन केले. तसेच उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई यांचे मार्फत देशाचे पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.विष्णूपंत सोळंके, नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक आसेफोद्दीन खतीब, नगरसेवक धम्मपाल सरवदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण, बीड जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कचरूलाल सारडा, रणजीत पवार, विशाल पोटभरे, दिनेश घोडके, सुनील वाघाळकर, अशोक देवकर, अतुल कसबे, विजय कोंबडे, बबन पानकोळी, सचिन जाधव, जावेद गवळी, महेश वेदपाठक, शेख मुख्तार, कैलास कांबळे, शेख खलील, चंद्रकांत महामुनी, प्रताप देशमुख, सुधाकर टेकाळे, शेख इस्माईल, ज्ञानोबा वैद्य, प्रशिक सिरसट, अशोक बनसोडे, जाकेर नदाफ आदींची उपस्थिती होती.