मुंबई: औरंगाबादच्या मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्युटचे कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेजला परिचर्या पदव्युत्तर (एम.एस्सी. नर्सिंग) अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या महाविद्यालयास एम.एस्सी (मेडिकल सर्जिकल नर्सिंग) आणि एम.एस्सी (कम्युनिटी हेल्थ नर्सिंग) हे अभ्यासक्रम प्रत्येकी 5 विद्यार्थी प्रवेशक्षमतेसह शैक्षणिक वर्ष सन 2020-21 पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या महाविद्यालयातील मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता प्रत्येकी 5 इतकीच राहील. मा. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, मा. उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने नर्सिंग अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, 1987 मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.