छत्रपती संभाजीनगर: भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर प्रदेश उपसंचालक पदावर किशोर जाधव रुजू झाले आहेत. या निमित्ताने कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आर. एम. कांबळे यांनी व सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. विजय वीर उपस्थित होते.
गेल्या सहा महिन्यांपासून भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर प्रदेश उपसंचालक पद रिक्त होते. किशोर जाधव यांची पदोन्नतीने या पदावर शासनाने नियुक्ती केली आहे. ते आज उपसंचालक पदावर रुजू झाले.
कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आर. एम.कांबळे यांच्यासह सुमीत भूईगळ वरिष्ठ उपाध्यक्ष कास्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्य, अविनाश शिंगाणे ज्येष्ठ मार्गदर्शक, राज्य संतोष मस्के विभागीय अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर, शेख जमीर विभागीय कार्याध्यक्ष छत्रपती संभाजीनगर, प्रशांत धारकर विभागीय सचिव छत्रपती संभाजीनगर मनोज निकम जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर, गणेश आर्दड विभागीय प्रसिद्धी प्रमुख यांनी श्री. जाधव यांचा सत्कार केला.
नाशिक च्या उपसंचालक पदावर महेश इंगळे:
नाशिक च्या भूमी अभिलेख उपसंचालक या रिक्त पदावर महेश इंगळे यांची तर उपसंचालक भूमी अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन) पुणे या रिक्त पदावर राजेंद्र गोळे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. या नियुक्तीचे ही कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.