नांदेड: प्रवाशांच्या सुविधे करिता मध्य रेल्वे आणखी एक विशेष गाडी चालवत आहे. गाडी संख्या 01045/ 01046 कोल्हापूर-धनबाद -कोल्हापूर विशेष एक्स्प्रेस 19 फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत सुरु होत आहे. ही गाडी संपूर्ण आरक्षित आहे. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही.
गाडीच्या वेळा पुढीलप्रमाणे:
1.गाडी संख्या 01045 कोल्हापूर ते धनबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शुक्रवारी): ही गाडी 19 फेब्रुवारी पासून दर शुक्रवारी पहाटे 04.35 वाजता सुटेल आणि पंढरपूर 07.55 लातूर 01.10, नांदेड 07.32, नागपूर 07.00, जबलपूर 03.40, गया 04.50 मार्गे धनबाद मार्गे 08.35 वाजता पोहोचेल.
2.गाडी संख्या 01046 धनबाद ते कोल्हापूर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर सोमवारी ): ही गाडी 22 फेब्रुवारी पासून धनबाद येथून दर सोमवारी सकाळी 10.20 वाजता सुटेल आणि गया -13.35, जबलपूर 01.05, नागपूर-09.55, नांदेड 10.20, लातूर -04.00, पंढरपूर -08.२२ मार्गे कोल्हापूर येथे दुपारी 12.40 वाजता पोहोचेल.
या गाडीस 19 डबे असतील. ही गाडी संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -19 संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.