# ठराविक प्रवासी रेल्वेसेवा 12 मे पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार; सोमवारपासून आयआरसीटीसीच्या वेब साईटवर ऑनलाईन आरक्षण उपलब्ध.

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्‍ली: मंगळवार, 12 मे पासून भारतीय रेल्वे हळूहळू प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे.  सुरुवातीला 15 मार्गावरील सेवा सुरू होतील (30 रिटर्न फेऱ्या). या रेल्वे स्पेशल रेल्वे म्हणून नवी दिल्ली स्टेशनवरून दिब्रुगड, आगरताळा, हावडा, पटना बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलोर, चेन्नई, तिरुवअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतावी या ठिकाणी सुरू होतील. त्यानंतर भारतीय रेल्वे आणखी स्पेशल सेवा नवीन मार्गांवर सुरू करेल. परंतु कोविड-19 सेवा केंद्रे म्हणून राखीव ठेवलेले 20,000 कोचेस तसेच दर दिवशी 300 गाड्या श्रमिक स्पेशल म्हणून राखीव ठेवल्यानंतर उरलेल्या डब्यांवर आधारित नवीन मार्ग ठरवले जातील.

यासाठीचे आरक्षण 11 मे रोजी दुपारी 4 पासून सुरू होईल आणि ते आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर  (https://www.irctc.co.in/)  उपलब्ध असेल. रेल्वे स्टेशनवरील आरक्षण खिडक्या बंद राहतील आणि तेथून कुठलीही तिकिटे (प्लॅटफॉर्म तिकीटासह) विकली जाणार नाहीत. केवळ असेच प्रवासी ज्यांच्याकडे वैध कन्फर्म तिकीट आहे त्यांना रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश दिला जाईल. प्रवाशांना फेस कवर वापरणे बंधनकारक असेल. तसेच गाडी सुटते वेळी त्यांची तपासणी केली जाईल आणि लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जाईल गाड्यांचे वेळापत्रक आणि इतर तपशील लवकरच जाहीर केला जाईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *