पुणे: शीर्षक वाचून तुम्ही हादरला असाल पण हे सत्य आहे संपूर्ण भारतात दरवर्षाला 5000 सफाई कामगार जे हंगामी काम करणारे कामगार असतात एकाद्या कंत्राटदाराचकडे पाचशे रुपये हजेरी वरती दिवसभर काम करणारे कामगार आणि कुठल्यातरी झोपडपट्टीत राहणारे असतात अशा कामगारांना हाताशी धरून हाउसिंग सोसायटीमध्ये एखाद्या गटाराचा चेंबर किंवा नाल्याचा चेंबर चोकप झाला असेल तर तो ते साफ करण्याचे काम असे कामगार करत असतात. एखादा दारू चा पेग पोटात घालून हे अशा मेन होलमध्ये खाली उतरतात कधी कधी अशा चेंबरमध्ये मिथेन गॅस तयार झालेला असतो तेथे गुदमरून अशा कामगारांचा मृत्यू होतो.
पनवेलमध्ये तर एका वेळेला तीन कामगार असेच उतरले आणि बराच वेळ आले नाही म्हणून त्यांचा कंत्राटदार जो स्वतः इंजिनीयर होता सिडकोचा कंत्राटदार होता तो सुद्धा आतमध्ये गुदमरून मेला. नाका कामगारांना ड्रेनेज चोकप होण्याची कारणे विचारली असता त्यांची उत्तरं ठरलेली असतात.. मासिक पाळीच्या वेळी महिला ज्या सॅनेटरी पॅड वापरतात ते बहुतेक वेळा संडासमध्ये टाकून फ्लश चालू करतात फ्लश मुळे साधारण कोरडे असलेले सॅनेटरी नॅपकिन पेड पाईप मधून खाली उतरते, जोपर्यंत त्यामध्ये असलेला कापूस मोठ्या आकाराचा होत नाही तोपर्यंत तो पुढे पुढे प्रवास करत जात असतो. मात्र, त्याचा प्रवास सुरू असताना वाटेमध्ये चेंबरच्या पाईपमध्ये त्याचा आकार पाणी झिरपून मोठा होतो व तो काढण्यासाठी चेंबरमध्ये मेन होलमध्ये कंत्राटी कामगार उतरतात कधी कधी तर चेंबर आठ फूट उंच असतो व तोंडो तोंड शिगोशीग भरलेला असतो. अशा वेळेला कामगार खाली उतरून नाक दाबून चेंबर साफ करणाऱ्यांचे फोटो व्हायरल झालेले आहेत.
कधीकधी चेंबरमधील त्या कापसा भोवती येऊन इतर प्लास्टिकचे तुकडे, कंडोम, गुटख्याची पाकिटे जमा होऊन चेंबर जाम झालेले असतात हे प्रमाण 99 टक्के असते. एक टक्का उंदीर किंवा घुशीने माती काढल्यामुळे चेंबर जाम होतात. आपणास कल्पना नसेल दरवर्षी भारतात किमान साडेचार ते पाच हजार कामगार चेंबर साफ करताना मेन होलमध्ये गुदमरून मेले आहेत.
यासाठी एक उदाहरण देता येईल, भारतात सर्वात स्वच्छ पेट्रोल पंप म्हणून ओळखला जाणारा पेट्रोल पंप संगमेश्वर धामणी येथे असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तो आहे. इतका स्वच्छ पेट्रोल पंप पाहून बरेच लोक आपली गाडी त्या पंपावरती घेऊन जातात त्या पंपावर असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याला विचारले की, तुम्ही एवढा पेट्रोल पंपपरिसर, प्रसाधनगृह स्वच्छ करता तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास जास्त होतो, तर त्यांनी सांगितले की सर्व साफ करताना कोणताच त्रास होत नाही. मात्र, प्रवासी महिला सॅनेटरी नॅपकिन पॅड टॉयलेटमध्ये टाकून जेव्हा फ्लश चालू करतात तेव्हा तो पॅड ड्रेनेजमध्ये जाऊन अडकतो, ड्रेनेज चोकप होतो तो साफ करताना खूपच त्रास होतो. त्यामुळे आपण आजच निर्धार करा.. यापुढे सॅनेटरी नॅपकिन पॅड कचऱ्याच्या डब्यात टाकणार आणि मासिक पाळी पासून जीव गमावणाऱ्या गरीब कामगारांच्या पत्नीला विधवा होण्यापासून वाचवणार आणि त्यांच्या मुलांना अनाथ होऊ देणार नाही असा संकल्प करूया…