पुणे: मान्सून १जून रोजी केरळमध्ये दखल होत असून, २ जूनला कोकण गोवा भागात येईल आणि पुढील २४ ते ४८ तासात मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ३ ते ४ जूनपर्यंत दाखल होणार आहे.
मान्सून ३० मे रोजी बंगालच्या उपसागरातून केरळच्या दिशेने ताशी ६०ते ६५ किमी. वेगाने निघाला असून, तो सोमवारी पहाटे केरळ काबीज करणार आहे. तेथून त्याच वेगाने महाराष्ट्रात प्रथम कोकणात २ जून रोजी तर गुजरातेत ३ जूनला दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अरबी समुद्रात मान्सूनला अतिशय पोषक वातावरण यंदा २९मे रोजीच तयार झाले. त्यामुळे मान्सून यंदा केरळात चार दिवस आधी तर महाराष्ट्रात पाच दिवस आधीच दाखल होत आहे. बंगालचा उपसागर, ओमान, लक्षद्वीप, केरळ भागात तुफान पाऊस सुरु झाला असून मान्सूनने वेग धरला आहे. मान्सून २ जूनला कोकणात आल्यावर पुढील २४ ते ४८ तासांत म्हणजे ३ते ४जून पर्यंत तो मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ काबीज करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.