नांदेड: रेल्वे पटरी चे नवीनीकरण करण्या करिता दिनांक 31 जानेवारी आणि 2, 5, 7 फेब्रुवारी हे चार दिवस लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे कार्य महत्वपूर्ण आहे. या लाईन ब्लॉकमुळे मराठवाडा एक्स्प्रेस वरील चार दिवस औरंगाबाद-मनमाड-औरंगाबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे:
१.गाडी संख्या 17688 धर्माबाद –मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस दिनांक 31 जानेवारी आणि 2, 5, 7 फेब्रुवारी हे चार दिवस औरंगाबाद ते मनमाड दरम्यान रद्द करण्यात आली आहे. ही गाडी धर्माबाद-औरंगाबाद दरम्यान तिच्या नियमित वेळे नुसार धावेल.
२.गाडी संख्या 17687 मनमाड ते धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस दिनांक 31 जानेवारी आणि 2, 5, 7 फेब्रुवारी, 2022 हे चार दिवस मनमाड ते औरंगाबाद दरम्यान रद्द करण्यात आली आहे. ही गाडी औरंगाबाद ते धर्माबाद दरम्यान तिच्या नियमित वेळे नुसार धावेल.
३.तसेच गाडी संख्या 17617 / 17618 नांदेड- मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस दिनांक 31 जानेवारी आणि 2, 5, 7 फेब्रुवारी, 2022 हे चार दिवस मनमाड ते लासूर दरम्यान 10 मिनिटे उशिरा धावेल.