ड्रॉप रो बॉल संघ राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे नाव करेल -धुपचंदजी राठोड
औरंगाबाद: ड्रॉप रो बॉल असोसिएशन औरंगाबाद यांच्या वतीने धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथील कामगार चौकामध्ये अनाथ व कामगारांना मास्क वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राज्याच्या मानव विकास मिशन संस्थेचे उपायुक्त धुपचंदजी राठोड यांची उपस्थिती होती.
ड्रॉ बाॅल या अस्सल ग्रामीण खेळाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव कोरले आहे. औरंगाबादच्या संघाने आजपर्यंत एकूण तेवीस मेडल्स प्राप्त केले आहेत. त्यातील नऊ विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके प्राप्त करून औरंगाबाद विभागाचे नाव राष्ट्रीय पातळीवर हरियाणा आणि पंजाब यांना मागे टाकून पुढे नेले आहे . आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ निश्चित चांगली कामगिरी बजावेल, अशी अपेक्षा आयुक्त धुपचंदजी राठोड यांनी व्यक्त केली.
विविध खेळ प्रकारात 38 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून त्यामध्ये तेवीस विद्यार्थ्यांनी पदकाची कामगिरी करणे हे आपल्या क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय पातळीवर पदकाची कामगिरी करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे स्पोर्ट कोट्यामध्ये नोकरीसाठी पात्र ठरू शकतात. याबद्दल ड्राॅप रो बॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी क्रीडा संचालक डॉ.अशोक पवार व उपध्यक्षा डॉ.राणीताई पवार, सचिव डॉ.मुरलीधर राठोड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
देशाचे नाव राष्ट्रकुल स्पर्धेत निश्चित झळकवतील आसे गौरवोद्गार डॉ.अशोक पवार यांनी काढले. दोन वर्षात राष्ट्रीय पातळीवर एकूण २३ मेडल प्राप्त केले आहेत. यामध्ये ९ गोल्डमेडलचा समावेश असल्याचेही डाॅ.अशोक पवार म्हणाले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे कर्तव्य भावनेतून संघटनेने अनाथ मुकबधीर कामगारांना कीट वाटप केल्याचेही डॉ.अशोक पवार यांनी सांगितले.
उपाध्यक्ष प्रा.डॉ. राणी पवार, सचिव डॉ.मुरलीधर राठोड, प्राध्यापक डॉ.अब्दुल वहीद, प्रा.गणपत पवार, अमोल राठोड, सुरेश राठोड, औरंगाबाद जिल्ह्याचे सचिव प्रा. डॉ. मुरलीधर राठोड आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
सुवर्णपदक विजेते खेळाडू:
अमोल राठोड, अभिजीत तुपे, प्रदीप राठोड, सचिन चव्हाण, पवन राठोड, संतोष तडवी, अमोल चव्हाण, रवींद्र तडवी.
रौप्यपदक विजेते खेळाडू:
नकाशा कुलकर्णी, श्रद्धा मुलिया, पूजा पांडे, राहुल गवळी, अभिजीत जाधव, रुमान शेख, शुभांगी शिंदे.
कांस्यपदक विजेते खेळाडू:
माधुरी गुरव, समीक्षा राठोड, आरती काळे, मोनाली चव्हाण, प्रिया माझी, नम्रता थोरात, शिवांजली सावंत, विना मुलिया, रोहित दिवेकर.