एमसीएम टीव्ही एंटरटेनमेंट व महाराष्ट्र टुडे औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे थाटात उद्घाटन
औरंगाबाद: सध्याचं युगात डीजिटल मीडियाला मोठं महत्व आलं आहे. आपण बसल्या ठिकाणी मोबाईलवर जगातील कुठल्या देशात काय चाललंय हे पाहू शकतो. अशा या काळानुसार बदलत्या युगात मीडियानं अधिक सजग झालं पाहिजे व जनजागृतीचं काम केलं पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त जिल्हा न्यायाधीश तथा विभागीय पोलीस प्राधिकरण औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष डी. जे. शेगोकार यांनी केले.
एमसीएम टीव्ही एंटरटेनमेंट व महाराष्ट्र टुडे या डीजिटल मीडियाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलल होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एमसीएम टीव्ही नवी मुंबईचे कार्यकारी संपादक दासू वळवी, पुणे येथील इतर मागासवर्ग विभागाच्या सहायक आयुक्त जयश्री सोनकवडे व निवृत्त उपजिल्हाधिकारी ड़ॉ. एन.आर. शेळके, नगर भूमापन अधिकारी शालिनी बिदरकर इंगळे यांच्यासह एमसीएम टीव्हीचे कार्यकारी संचालक जनार्दन शिंदे व महाराष्ट्र टुडे चे संपादक विलास इंगळे यांची उपस्थिती होती.
एमसीएम टीव्ही व महाराष्ट्र टुडे ने आता जनजागृतीपर व वस्तुनिष्ठ बातम्या द्याव्यात, अशी अपेक्षाही श्री. शेगोकार यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सहायक आयुक्त जयश्री सोनकवडे म्हणाल्या की, आपण चॅनलच्या माध्यमातून मराठवाड्यातील सामाजिक प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. डॉ. एन. आर. शेळके यांनीही, या चॅनलने मराठवाड्यातील ज्वलंत प्रश्नांसह सामाजिक, आर्थिक प्रश्न सोडविण्यासह राजकीय प्रश्नांवरही सडेतोड भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी दासू वळवी, शालिनी बिदरकर इंगळे यांनीही एमसीएम टीव्ही व महाराष्ट्र टुडे ला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र टुडे चे संपादक विलास इंगळे यांनी केले तर एमसीएम टीव्ही एंटरटेनमेंटचे कार्यकारी संचालक जनार्दन शिंदे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅमेरामन राजेश गोकलानी, अजय कस्तुरे, अशोक वीरकर, विष्णू वाघमोडे, पूजा केदारे, दीक्षा खरात, संगीतकार साई शिंदे, सागर शिंदे, सौ. प्रतिमा शिंदे, सौ. योगिता शिंदे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमास वरिष्ठ पत्रकार सुरेश पाटील, सुधीर जगदाळे, दै. दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक संतोष भांडवले, उपसंपादक रवींद्र वाडेकर, लोककलावंत दिलीप खंडेराय, अभिनेता दिलीप वाघ, रमेश सोनवणे, अनिल उगले, जय मांडवे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजा मंडलिक, साईनाथ जाधव, संतोष वाघ, संतोष येटाळे, सुरेश वल्ले, अभिनेता सागर वळवी, अच्युत भोसले, कोमल पांजगे, परशुराम बिदरकर, सौ. रुक्मिणी बिदरकर, उद्योजक रमेश खरटमल, प्रकाश पोळ, शोभा पोळ, व्ही. एम. दिवे, एस.व्ही. दिवे लक्ष्मीकांत सोनवणे, शुभम सोनवणे, यशश्री इंगळे, सृष्टी इंगळे, नगर भूमापन कार्यालयाचे अनिल रूपेकर, भास्कर बोचरे, आनंद शिंदे, नृसिंह चिल्कावार, शेख आरेफ आदी उपस्थित होते.