# महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार कोरोना पॉझिटिव्ह; मुंबईत होमक्वारंटाइन.

औरंगाबादः राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. स्वतः सत्तार यांनीच फेसबुक पोस्ट करून ही माहिती दिली. सत्तार कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ते मुंबईत होमक्वारंटाइन आहेत. विशेष म्हणजे सत्तार यांचे चिरंजीव सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, स्वीय सहायक, गार्ड, वाहनचालक, प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

शंका आली म्हणून राज्यमंत्री सत्तार यांनी आधी अँटिजन टेस्ट करून घेतली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांची आरटीपीसी टेस्ट करण्यात आली. तीही पॉझिटिव्ह आली आहे. ‘थोडी शंका आली होती म्हणून आज कोरोना तपासणी केली. दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करताना चुकून प्रादुर्भाव झाला असेल. परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल.
मुंबईतील लिलावती रुग्णालयातील डाॅ. जलील पारकर यांच्याकडून उपचार घेतले असून, मी मुंबईतच होम क्वारंटाइन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी, असे सत्तार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *