मुलगी गर्भवती राहिल्याने प्रकरण उघडकीस; आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी
गंगापूर: शहरांमध्ये सख्ख्या भावानंतर नात्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षकाने अत्याचार केल्याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर भावानंतर बावन्नवर्षीय नराधमाविरुध्द १३ ऑक्टोबर रोजी पोक्सो कायद्याअंतर्गत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. येथील न्यायालयाने १७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून डीएनए चाचणीनंतर खरा आरोपी कोण याचा उलगडा होईल.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसान छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष होनाजी याने नात्यातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरी कोणी नसतांना सहा महिन्यांपूर्वी व नंतर वारंवार बलत्कार केला. पिडितीने सुरुवातीला भावाने अत्याचार केल्याचे सांगितले. त्यामुळे गंगापूर पोलिसांनी शुक्रवारी सुरुवातील भावाविरुध्द गुन्हा दाखल केला. परंतु या प्रकरणात आणखी एक गुन्हेगार असून, तो पोलीस खात्यात असल्याने मुलीला त्याचे नाव सांगण्याची हिंमत झाली नाही. मात्र, पाेलिसांना त्या बद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पिडितेला धीर देत अधिक माहिती घेतली असता तीने नातेवाईक असलेल्या आरोपी सहायक पोलीस निरीक्षक गांगुर्डेनेही वेळोवेळी आपल्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा केला. तसेच पिडितेच्या भावाने जीवे मारण्याची धमकी देत शेतात व घरात अत्याचार केला. यामुुहे पिडीता दोन महिन्याची गर्भवती राहिली. या प्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरून सुरुवातीला तिचा भावावर नंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष गांगुर्डे (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्या विरोधात पोक्सो व विविध कलमाअंतर्गत १३ ऑक्टाेबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडिता गर्भवती राहिल्याने घटना समोर:
अत्याचारानंतर अल्पवयीन पीडिता दोन महिन्यांची गर्भवती राहिल्याने तिचे सारखे पोट दुखत होते. त्यामुळे कुटुंबियांनी तपासणी केली असता, हा प्रकार समोर आला. आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने सुरुवातीला फक्त भावाचेच नाव सांगितले. मात्र, पोलिसांच्या अधिक तपासात पोलिस खात्यात नातेवाईक असलेल्या आरोपींचे नावही समोर आले.
पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या:
पोनि सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि ज्ञानेश्वर साखळे व पोउपनि अझहर शेख यांनी मालेगाव येथे नातेवाइकाकडे लपून बसलेल्या आरोपी भावाला व पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे यांना ताब्यात घेतले. गांगुर्डे याला येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने १७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून वरील दोन्ही आरोपींची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे गंगापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे यांनी सांगितले आहे.