# मिशन बिगीन अगेन: शासकीय कार्यालयात अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती 15 टक्के; राज्य शासनाचे नवे दिशानिर्देश जारी.

 

मुंबई: केंद्रापाठोपाठ राज्यानेही नवीन दिशानिर्देश (guidelines) जारी केले आहेत. यामध्ये 30 जूनपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आला असला तरी यामध्ये काही प्रमाणात आणखी सूट दिली आहे. यासाठी मिशन बिगीन अगेन, हे नाव देण्यात आले आहे. त्यानुसार जनजीवन सुरळीत होण्यासाठी नवीन नियमावलीत कन्टेन्मेंट झोन वगळून नव्याने आणखी सूट दिली आहे.

शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत मुंबईसह पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक मालेगाव, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर या क्षेत्रातील कन्टेन्मेंट झोन वगळता शासकीय कार्यालयात अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती 15 टक्के किंवा कमीत कमी 15 अशी करण्यात आली आहे. उर्वरित राज्यात पूर्वीप्रमाणे 100 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

राज्यात माॅर्निंग वाॅक, रनिंग, सायकलिंगला परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक मैदान खुली करण्यात येतील. समुद्र किनार्यावर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्यातील हॅटेल, माॅल्स, धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत. तसेच सामूहिक कार्यक्रमांना बंदी असेल. शाळा, काॅलेज बंद राहणार आहेत. तसेच मेट्रो रेल्वे बंद असतील.

केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईननुसार कन्टेन्मेंट झोनमध्ये सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. असे असले तरी यामध्ये टप्प्याटप्प्याने सूट दिली जाणार आहे. ही सूट देताना तीन टप्प्यांत काय सुरू करायचे याचे दिशानिर्देश दिले आहेत.

पहिला टप्पा 3 जूनपासून: हाॅटेल, रेस्टॉरंट, शाॅपिंग माॅल्स उघडले जातील. मात्र, त्यासाठी नियम व अटी लागू राहतील.

दुसरा टप्पा 5 जूनपासून: दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, गर्दी टाळण्यासाठी व सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून ही दुकाने सम व विषम तारखेनुसार एका दिवशी एकाच बाजूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत उघडी राहतील. कपड्यांच्या दुकानांसाठी ट्रायल रूमला परवानगी दिली जाणार आहे. कॅब, रिक्षा व चारचाकी गाडीत ड्रायव्हर अधिक दोन अशा तिघांना परवानगी असेल. दुचाकीवर केवळ एकालाच परवानगी असेल.

तिसरा टप्पा 8 जूनपासून: खाजगी कार्यालयात 10 टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.  इतर कर्मचारी यांना वर्क फ्राॅॅम होम. आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो रेल्वे, सिनेमा थिएटर, जीम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, ऑडिटोरिएम व बार  याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *