मान्सून 30 मे पर्यंत केरळमध्ये; महाराष्ट्रात 5 जूनला होणार दाखल!

पुणे: वार्‍याची योग्य दिशा आणि अनुकूल स्थितीच्या परिणामामुळे मान्सून पुढे सरकण्यास वातावरण तयार झाले आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात (30 मे) केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वाढली असल्याचे शुक्रवारी हवामान विभागाने जाहीर केले आहे. दरम्यान, मान्सूनचा असाच प्रवास सुरू राहिल्यास महाराष्ट्रात 5 जूनच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे.  

बंगालचा उपसागरातील दक्षिण भागासह अंदमान समुद्र तसेच अंदमान निकोबार बेटांवर मागील पाच ते सहा दिवसांपासून थबकलेल्या मान्सूनला पुढे वाटचाल करण्यास गुरूवारपासून अनुकूल स्थिती तयार झाली. कमी दाबाचे वाढलेले पट्टे तसेच वार्‍याची योग्य दिशा आणि बाष्प यामुळे थांबलेला मान्सून पुढे सरकण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी मान्सूनने दक्षिण अरबी समुद्र, संपूर्ण मालदीव आणि लक्षव्दीप बेटांबरोबर कोमोरीनाचा भाग व्यापला. त्यामुळे या भागात सध्या जोरदार पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, मान्सून पुढे सरकण्यास आणखी चांगल्या वातावरणाची निर्मिती झाली. त्यामुळे येत्य दोन ते तीन दिवसात (30मे) मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मान्सूनचा असाच प्रवास सुरू राहिल्यास तळकोकण, तसेच कोकणचा उर्वरित भागाबरोबर राज्याच्या बहुतांश भागात 5 जूनच्या आसपास मान्सून पोहचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *