# कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात देशात 24 तासांत 10 लाखांपेक्षा जास्त चाचण्या.

नवी दिल्ली: देशामध्ये कोविड-19 चाचण्यांचे प्रमाण सातत्याने वाढविला जात आहे. आज कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने महत्वपूर्ण टप्पा ओलांडला. एका दिवसामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या चाचण्या आज देशात करण्यात आल्या.

केंद्र आणि राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्या संयुक्त आणि निरंतर प्रयत्नांमुळे भारताने गेल्या 24 तासांमध्ये 10 लाख लोकांच्या कोविड-19 चाचण्या पूर्ण केल्या. या यशामुळे देशामध्ये आतापर्यंत 3.4 कोटी जणांपेक्षा जास्त लोकांच्या (3,44,91,073) चाचण्या झाल्या आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त चाचण्या देशामध्ये दररोज चाचण्यांची संख्या वाढत आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये दररोज होत असलेल्या चाचण्यांची संख्या वाढत असल्यामुळे देशभरातल्या चाचणी प्रमाणाची सरासरीही वाढत आहे. सरकारी दररोज होत असलेल्या चाचण्या (सप्ताहानुसार) गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक म्हणजे 10,23,836 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 चाचण्या घेण्यासाठी आक्रमकतेने प्रयत्न करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता कोविडग्रस्त होण्याच्या प्रमाणात कमालीची घट दिसून येत आहे. तसेच सकारात्मक रूग्ण लक्षात आल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करणे शक्य होत आहे. सकारात्मक रूग्णांच्या विलगीकरणानंतर वेळेवर प्रभावी निदान व्यवस्थापन करण्यात येत असल्यामुळे एकत्रितपणे कोविडचा लढा यशस्वी होत आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, केंद्र आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांचे धोरणात्मक निर्णय यामुळे देशभरामध्ये चाचण्यांचे काम सुलभतेने होत आहे. दैनंदिन चाचण्या क्षमतावृद्धीला चालाना मिळाली आहे.

चाचणी प्रयोगशाळांचे जाळे देशभरात सातत्याने बळकट होत आहे, आजच्या दिवशी देशभरात 1511 प्रयोगशाळा असून, 983 शासकीय प्रयोगशाळा आणि 528 खासगी प्रयोगशाळांमध्‍ये चाचण्‍या करण्यात आल्या.

यामध्ये- रिअल टाइम रॅपिड टेस्ट आधारित चाचणी प्रयोगशाळा –778  (सरकारी – 458 + खासगी 320)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा – 615 (सरकारी – 491 + खासगी – 124)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा –118 (सरकारी -34 + खासगी 84)

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना पाहायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी:
https://www.mohfw.gov.in/आणि @MoHFW_INDIA.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा:
technicalquery.covid19@gov.in
आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in आणि 
@CovidIndiaSeva .

कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (टोल फ्री). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.
coronvavirushelplinenumberhttps://www.mohfw.gov.in/pdf/.pdf .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *