जिल्हाधिकारी कार्यालय व महाविद्यालय प्रशासनाने वीज बीलाची ३.५ कोटींची भरली थकबाकी
अंबाजोगाई: स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय विभागात नोव्हेंबर २०२१ मध्ये आलेली १७.५ कोटी रुपयांची ०.३ टेस्ला एमआर आय मशीन सुरु होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून येत्या महिन्याभरात या मशीनचे एन्सटॉलेशन पूर्ण होईल अशी माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात गेली अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली अत्याधुनिक बनावटीची “०.३ टेस्ला एमआरआय मशीन” २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यात रुग्णालय परिसरात दाखल झाली. या एमआरआय मशीन साठी सीटी स्कॅन युनीट शेजारी तज्ज्ञांच्या मार्गदर्शना खाली अद्ययावत इमारत उभी करण्यात आली असून मशीन फिटींग चे काम पूर्ण करुन घेण्यात आले. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयाकडे ३.५ कोटींचे वीज बील थकीत असल्यामुळे वीज मंडळाने सदरील मशीन सुरू करण्यासाठी ४०० केव्हढी वॅटचा विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी असमर्थता दर्शवली होती. या संदर्भात वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांशी बोलणे झाल्यानंतर थकबाकी भरल्याशिवाय हा ४००केव्हीचा विद्युत पुरवठा सुरु करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
एमआरआय मशीन सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली ३.५ कोटींची थकबाकी भरण्यासाठी राज्यशासनाने निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले होते. त्या अनुषंगाने राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीनुसार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभागाकडे उपलब्ध झालेल्या निधीतून या बीलाची मोठी रक्कम वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने भरण्यात आली व अलिकडेच जिल्हाधिकारी कार्यालयातुन थकीत ब वीज बीलांसाठी १ कोटी ९२ लाख रुपयांच्या निधीची मदत केली व संपूर्ण वीज बील थकबाकी बेबाक केली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडे थकबाकी असलेले संपूर्ण विद्युत बील भरले असल्यामुळे आता एमआरआय मशीन सुरु करण्याचा मोकळा झाला आहे. सदरील मशीन सुरु करण्यासाठी आता चनई सब स्टेशन मधून सरळ ४०० केव्ही वॅट व्होलटेज वाढवण्यात आल्या नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एमआरआय मशीनला विद्युत प्रवाहाची जोडणी करुन दिली की ही मशीन सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
एमआरआय मशीन सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली ३.५ कोटींची वीज थकबाकी भरण्यासाठी राज्यशासनाने निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले होते. या सर्व प्रयत्नाला पालकमंत्री धनंजय मुंडे व विधान परिषदेचे सदस्य आ. संजय दौंड यांनी प्रयत्न करुन राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीनुसार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विभागाकडे उपलब्ध झालेल्या निधीतून या बीलाची मोठी रक्कम वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने भरण्यात आली. अलिकडेच जिल्हाधिकारी कार्यालयातून थकीत वीज बीलांसाठी १ कोटी ८२ लाख रुपयांच्या निधीची मदत केली व संपूर्ण वीज बील थकबाकी बेबाक केली आहे.