नांदेड: प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई-नांदेड-मुंबई विशेष रेल्वे सुरु करण्याचे ठरविले आहे. ही रेल्वे पूर्णपणे आरक्षित असेल. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. ही गाडी रविवार, ११ ऑक्टोबर २०२० पासून धावणार आहे.
गाडीच्या वेळा आणि दिनांक पुढीलप्रमाणे:
१)गाडी संख्या ०११४१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते हुजूर साहेब नांदेड- ही गाडी ११ ऑक्टोबर २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रोज सायंकाळी ०४.३५ वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०५. ३० वाजता पोहोचेल.
२)गाडी संख्या ०११४२ हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- ही गाडी १२ ऑक्टोबर पासून हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावरून रोज सायंकाळी ०५. ०० वाजता सुटेल आणि औरंगाबाद-मनमाड मार्गे मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०५. ३५ वाजता पोहोचेल.
ही गाडी दोन्ही दिशेला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी आणि पूर्णा येथे थांबेल.
या गाडीस एकूण १८ डब्बे असतील. या गाडीत वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, द्वितीय श्रेणी आरक्षित आणि आरक्षित सीटिंग डब्ब्यांची सुविधा असेल. ही विशेष गाडी नियमित रेल्वे गाडी सुरु होईपर्यंतच असेल. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.