नांदेड-हुबळी, नांदेड-तिरुपती विशेष गाड्या

नांदेड: दक्षिण मध्य रेल्वे नांदेड ते कर्नाटक राज्यातील हुबळी आणि नांदेड ते तिरुपती दरम्यान दोन विशेष गाड्या चालविणार आहे.

1)    नांदेड-हुबळी विशेष रेल्वे साप्ताहिक सेवा: गाडी क्रमांक 07635  ही गाडी 6 ऑगस्ट रोजी शनिवारी दुपारी 02.10 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन,  कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घाटप्रभा, बेळगावी,  लोंढा जं., धारवाड मार्गे हुबळी येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 09.00 वाजता पोहोचेल.

2)   हुबळी-नांदेड विशेष रेल्वे साप्ताहिक सेवा: गाडी क्रमांक 07636  ही गाडी 7 ऑगस्ट रोजी रविवारी सकाळी 11.15 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच आणि नांदेड येथे सोमवारी सकाळी 08.10 वाजता पोहोचेल.

3)   नांदेड-तिरुपती विशेष रेल्वे साप्ताहिक सेवा: गाडी संख्या 07633  नांदेड-तिरुपती विशेष गाडी 6 ऑगस्ट रोजी नांदेड येथून दुपारी 12.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चात्तापूर, सुलेहाल्ली, यादगीर, कृष्णा, रायचूर , मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, गुती, तादिपात्री, यार्रागुंतला, कडप्पा आणि रेणीगुंठा मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 08.30 वाजता पोहोचेल.

4)   तिरुपती-नांदेड विशेष रेल्वे साप्ताहिक सेवा : गाडी संख्या 07634 तिरुपती-नांदेड विशेष गाडी 7 ऑगस्ट, 2022 रोजी तिरुपती येथून रात्री 09.10 वाजता सुटेल आणि गेलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवाशी सायंकाळी 05.20 वाजता पोहोचेल. दोन्ही या गाड्यामध्ये वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल चे डब्बे असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *