# नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी तात्पुरती औरंगाबाद मार्गे.

नांदेड: सोलापूर विभाग, मध्य रेल्वे मधील भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे कार्य पूर्ण करण्याकरिता तसेच इतर तांत्रिक कार्य करण्याकरिता नॉन-इंटरलॉक  ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे गाडी संख्या ०७६१४/०७६१३  नांदेड-पनवेल-नांदेड या विशेष मार्गे परळी, लातूर या गाडीच्या १८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या .

परंतु प्रवाशांच्या आग्रहाखातर नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी रद्द केलेल्या कालावधीत आठवड्यातून चार दिवस (सोमवारी-बुधवारी-गुरुवारी आणि शनिवारी) तिचा नियमित मार्ग बदलून  परभणी, औरंगाबाद-मनमाड मार्गे धावेल. ती पुढीलप्रमाणे:

मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या:

1) गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पवनेल विशेष गाडी दिनांक १८, २०, २२, २४, २५, २७, २९ आणि ३१ मार्च, २०२१  रोजी परळी, लातूर, कुर्डुवाडी  मार्गे न धावता मार्ग बदलून परभणी-१८.५०, सेलू-१९.३१, परतूर-१९.५१, जालना-२०.३२, औरंगाबाद -२२.०५, मनमाड-०१.३५ कोपरगाव-०३.०७ , पुणे-०९.३० , मार्गे  धावून पनवेल येथे १२.३० वाजता पोहोचेल.

2) गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड विशेष गाडी दिनांक १९, २१, २३, २५, २६, २८ आणि ३०  मार्च, २०२१  रोजी पनवेल येथून १६.०० वाजता सुटून लातूर, परळी मार्गे न धावता तिचा मार्ग बदलून पुणे-१९.३०, कोपरगाव- ०२.०२, मनमाड-०४.१०, औरंगाबाद-०६.१५, जालना-०७.०२, परतूर-०७.३१, सेलू-०७.५१, परभणी-०८.४७, पूर्णा ०९.२० मार्गे नांदेड येथे सकाळी ११.०० वाजता पोहोचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *