पुणे: पुणे शहर व परिसरात आज रविवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला व वातावरण आल्हाददायक झाले. सायंकाळच्या सुमारास आकाशात ढगांच्या गर्दीमुळे विविधरंगी छटा तयार झाल्या होत्या. त्यामुळे वातावरण अधिकच आल्हाददायक झाले होते.
आकाशात रंगबिरंगी व गुलाबी छटा तयार झाल्यामुळे वेगळाच व आल्हाददायक असा अनुभव या रंगसंगती पाहताना येत होता. सूर्य मावळला असला तरी झाडांच्या मागे सूर्य लपला असल्यासारखा भास होत होता. जणू काही ठरावीक ठिकाणीच सूर्यकिरणे पडली असावीत असे जाणवत असल्यामुळे झाडांची छबीही मनमोहक अशी जाणवत होती. हे वातावरण कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह न झाला तर नवलच.
आकाशातील या रंगबिरंगी छटांचा आनंद घेण्यासाठी अनेकजण टेरेसवर येऊन आकाशातील या निसर्गाच्या जादुई रंगांचा आनंद घेत होते. या रंगसंगती टिपल्या आहेत, बारावीत शिकणाऱ्या सृष्टी हिने. कुठल्याही प्रोफेशनल फोटोग्राफरला लाजवेल अशा या विविधरंगी छटा तिने आपल्या मोबाईलच्या कॅमरेऱ्यात कैद केल्या आहेत.
Wow😍😍😍🍁🤩
आकाशातील रंगसंगतीचे फोटो म्हणजे नजरेवर आल्हाददायक शिडकावाच..! वातावरण दिवसाच्या कोणत्याही वेळेला आहे तो क्षण टिपण्यासाठी खुणावतेच ! फक्त आपण घेतलेला आनंद इतरांना देण्यात धन्यता असते..!अभिनंदन!
धन्यवाद ‘महाराष्ट्र टुडे’ला!
सुरेंद्र कुलकर्णी
9767202265
धन्यवाद