मुंबई: क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने (NCB) केलेली संपूर्ण कारवाईच बोगस असल्याचा दावा करून खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीबाबत नवा गौप्यस्फोट केला आहे. मात्र, यावेळेस त्यांनी ही माहिती पत्रकार परिषदेतून न देता ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
काय म्हणाले नवाब मलिक..
यावेळी पत्रकार परिषदेतून नाही, तर.,
क्रूझवरील प्रकरणी एनसीबीच्या कारवाईवर गंभीर आरोप करत मंत्री नवाब मलिक वारंवार नवा गौप्यस्फोट करत आहेत. नवाब मलिक यांनी आतापर्यंत दोन वेळा पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. या कारवाईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचंही त्यांनी उघड केलं आहे. या सर्व घडामोडीत त्यांनी एक ट्वीट केलं असून पुन्हा एकदा एनसीबीला उघडं पाडण्याचा इशारा दिला आहे.
काय म्हटलयं ट्विट मध्ये..
आपण पुन्हा एकदा एनसीबीकडून केलेल्या चुकीच्या गोष्टी उघड करणार आहे. मात्र, यावेळी पत्रकार परिषद नाही तर ट्विटवरुन उघडं पाडणार. त्यामुळे नवाब मलिक आता काय नवीन खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटलं आहे.