नांदेड: दक्षिण मध्य रेल्वे चे नवीन वेळापत्रक दिनांक 1 ऑक्टोबर, 2023 पासून अमलात आले आहे. या नवीन वेळापत्रकानुसार नांदेड रेल्वे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे मधील काही रेल्वे स्थानकावरील काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे.
नांदेड रेल्वे विभागातर्फे सर्व प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी नवीन वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा. नवीन वेळापत्रक विषयी माहिती हेल्प लाईन नंबर 139 वर, किंवा National Train Enquiry System (NTES) या संकेत स्थळावर , किंवा रेल्वे स्थानकावर चौकशी कार्यालयात किंवा स्टेशन मास्टर उपलब्ध आहे. सर्व प्रवाशांना विनंती की त्यांनी नवीन वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.