नागपूर: किसानपुत्र आंदोलनाचे तिसरे ऑनलाईन शिबीर २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत होत आहे. या शिबिराचा विषय ‘शेतकरीविरोधी कायदे’ आहे. शंभराहून अधिक शिबिरार्थी यात सहभागी होतील, अशी माहिती या शिबिराचे संयोजक दीपक नारे (नागपूर), समन्वयक मयूर बागुल (पुणे) व मार्गदर्शक अमर हबीब यांनी दिली.
ज्येष्ठ साहित्यीक व निवृत्त अधिकारी लखनसिंग कात्रे (गोंदिया) यांच्या हस्ते २६ ऑक्टोबर रोजी सायं 7 वाजता उद्घाटन होईल व 2 नोव्हेंबर रोजी अमर हबीब यांच्या व्याख्यानाने समारोप होईल.
26 नोव्हेंबर रोजी डॉ.आशिष लोहे (वरुड, अमरावती)- आवश्यक वस्तू कायदा व नवे तीन कायदे या विषयावर बोलतील. २७ ऑक्टोबर रोजी प्रमोद टाले (बुलढाणा)-सिलिंग कायदा, २८ ऑक्टोबर रोजी सम्राट डोंगरदिवे (कारंजा, अकोला)-जमीन अधिग्रहण कायदा, २९ ऑक्टोबर रोजी ऍड. दिनेश शर्मा (पुलगाव वर्धा)- शेतकरी विरोधी घटनादुरुस्त्या, ३० ऑक्टोबर रोजी संदीप धावडे, (वर्धा) सर्जकांचे स्वातंत्र्य, ३१ ऑक्टोबर रोजी चंद्रकात झटाले (अकोला), सुनील भोयर (चंद्रपूर), दीपक नारे (नागपूर)- कायदे रद्द करून घेण्याची रणनीती अर्थात किसानपुत्र आंदोलन, १ नोव्हेंबर रोजी संदीप रोडे, मोर्शी (अमरावती), प्रशांत देशमुख (वर्धा), योगेश हातमोडे (चिलगव्हाण, यवतमाळ), संदीप जाधव (पुसद), संजय लोहकरे (वर्धा), सतीश डोबले (कारंजा, वर्धा), अशोक पालीवाल (कारंजा वर्धा), गजानन घुमारे (तेल्हारा, अकोला), सचिन जिगरोल (सावनेर, नागपूर) व अन्य किसानपुत्र आपले मनोगत व्यक्त करतील. २ नोव्हेंबर रोजी अमर हबीब यांच्या व्याख्यानाने समारोप होईल.
शिबिरार्थींनी खालील लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
https://forms.gle/snLXCuw5WAyivKaa8
शिबिरात पूर्णवेळ हजर राहणाऱ्या शिबिरार्थींना ऑनलाइन प्रमाणपत्र दिले जाईल, अशी माहिती संयोजक दीपक नारे 9689418761 यांनी दिली.