नवी दिल्ली: शास्त्रीय गायनातील तपस्वी संगीत मार्तंड पद्मभूषण पंडित जसराज (वय 90) यांचे अमेरिकेत निधन झाले. ते मेवाती घराण्याचे गायक होते. त्यांच्या पश्चात पत्नी मधू जसराज आणि कन्या दुर्गा आहेत.
पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 मध्ये झाला होता. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्यांनी वडील पं. मोतीराम यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांचे थोरले बंधू मेवाती घराण्याचे महाराज जयवंतसिंह वाघेला आणि उस्ताद गुलाम कादरखाँ व आग्रा घराण्याचे स्वामी वल्लभदास यांच्याकडून त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले.
पंडित जसराज यांचे नाव मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांदरम्यान असलेल्या ग्रहाला 2006 मध्ये देण्यात आले. असा सन्मान प्राप्त करणारे पंडित जसराज एकमेव होते.