# औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीच्या आदेशात अंशत: बदल.

30 मार्च रोजी सर्व आस्थापना/ कार्यालये रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार

औरंगाबाद: जिल्ह्यात कलम 144 नुसार लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या आदेशात सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अंशत: बदल जिल्हा प्रशासनाने केले आहेत. मूळ आदेशातील इतर सर्व बाबी कायम राहणार असल्याचेही जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. बदलांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे.
1. औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीपावेतो बुधवार दि. 31 मार्च रोजी 00.01 वाजेपासून ते शुक्रवार दि. 9 एप्रिल 2021 च्या 24.00 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत. मंगळवार दि. 30 मार्च रोजी सर्व आस्थापना/कार्यालये रात्री 8 वाजेपर्यंत पूर्ववत चालू राहतील.
2.  राष्ट्रीय/राज्य / विद्यापीठ/शासन/शिक्षणमंडळ (Education Board) /( Pre-Board school ezam)/ बँक इ. स्तरावरील पूर्वनियोजित परीक्षांसाठी परीक्षांर्थींना आवागमनासाठी सूट देण्यात येत आहे. परीक्षार्थींनी संबंधित परीक्षेचे प्रवेशपत्र्‍ (Hall Ticket) सोबत बाळगणे अनिवार्य राहिल.
3.    पेट्रोलपंप सर्व नागरिकांसाठी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत खुले राहतील. नागरिकांनी अत्यावश्यक बाब असेल तरच पेट्रोल पंपावर जावे व गर्दी टाळावी अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. दुपारी 12 वाजेनंतर पेट्रोलपंप धारक यांनी फक्त अत्यावश्यक सेवेमधील व ज्यांना संचारबंदीतून सुट दिलेली आहे त्यांना इंधन पुरवठा करतील.
4.   औरंगाबाद जिल्ह्यातील होम आयसोलेशन मधील कोवीड-19 रुग्णांची संख्यालक्षात घेऊन हॉटेल्सना होम डिलीव्हरी साठी रात्री 8 वाजेपर्यंत अनुमती राहिल असेही जिल्हा प्रशासनाने आदेशाव्दारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *