# राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के; आज कोरोनाच्या २५५३ नवीन रुग्णांची नोंद.

 

मुंबई: राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के एवढा असून, आज १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ९७५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २५५३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सोमवारी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ६४ हजार ३३१ नमुन्यांपैकी ८८ हजार ५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १०९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे: ठाणे- ७० (मुंबई ६४, कल्याण-डोंबिवली २, उल्हासनगर १, वसई-विरार १, भिवंडी १, ठाणे १), नाशिक- १३ (नाशिक २, जळगाव ६, धुळे ४, अहमदनगर १), पुणे- १३ (पुणे ७, सोलापूर ६), कोल्हापूर- ३ (रत्नागिरी ३), औरंगाबाद-९ (औरंगाबाद ८, जालना १), लातूर-१ (नांदेड १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०९ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५९ रुग्ण आहेत तर ४४ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ६ जण ४० वर्षांखालील आहे. या १०९ रुग्णांपैकी ७९ जणांमध्ये (७२.५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३१६९ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३ मे ते ५ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५१, औरंगाबाद -८, रत्नागिरी -३, धुळे – ४, अहमदनगर -१, भिवंडी -१, जळगाव – १, जालना -१, कल्याण डोंबिवली -१, नाशिक – १, पुणे -१, सोलापूर १, ठाणे -१, उल्हासनगर -१ आणि वसई विरार १ असे मृत्यू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *