# महावितरणच्या मुख्य अभियंत्यावर कारवाईसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल.

तीन अपत्ये असल्यामुळे सुरेश गणेशकर यांना बडतर्फ करण्याची मागणी

पुणे: महावितरण कंपनी औरंगाबाद येथील तत्कालिन मुख्य अभियंता सुरेश लक्ष्मण गणेशकर यांनी लहान कुटुंबाचे अटी शर्थीचा भंग केला आहे. त्यांना 2005 नंतर तिसरे आपत्य झाले असल्याने ते शासकीय नोकरी करण्यास अपात्र ठरतात त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच त्यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

महावितरण कंपनीत लहान कुटुंब अधिनियम 2005 (small family rules) पाळला जात नाही. हा कायदा 1 जुलै 2005 पासून राज्यात लागू करण्यात आला आहे. शासकीय नोकरीत रूजू होताना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागते. म्हणजेच दोन पेक्षा जास्त अपत्ये असतील तर नोकरी करण्यास अपात्र ठरविले जाते. सुरेश गणेशकर यांनाही 2005 नंतर तिसरे अपत्य झाले आहे. तरीही महावितरण कंपनी त्यांच्यावर कारवाई करत नाही. गणेशकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी याचिकाकर्ते यांनी वारंवार महावितरणचे संचालक, अध्यक्ष, सहसंचालक यांच्याकडे तक्रार अर्ज केले. मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. सुरेश गणेशकर महावितरण कंपनीमध्ये 1989 मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रूजू झाले. 2005 मध्ये ते सहायक अभियंता झाले. तसेच 2006 मध्ये ते सरळ सेवेने कार्यकारी अभियंता म्हणून रूजू झाले. दरम्यान, 2008 मध्ये त्यांना तिसरे आपत्य झाले. 2011 मध्ये सरळसेवेने ते अधीक्षक अभियंता झाले. 2016 मध्ये ते मुख्य अभियंता झाले.

सुरेश गणेशकर हे 2008 मध्येच शासकीय नोकरी करण्यास अपात्र ठरले असताना महावितरण कंपनीने त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. याउलट त्यांना उच्च पदस्थापना देऊन शासनाचे नुकसान केले आहे. यासाठी गणेशकर यांच्यावर कारवाई करून त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात यावे. तसेच त्यांच्याकडून फसवणूक केली म्हणून शासनाने नुकसान भरपाईची वसुली करावी, असेही याचिकेत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *