औरंगाबाद: औरंगाबाद येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आले असता, बार्टी संस्थेतर्फे फक्त 200 विद्यार्थींना फेलोशिप देण्यात येते. ही फेलोशिप केवळ 200 विद्यार्थ्यांना न देता सरसकट सर्व पीएच. डी. च्या विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या संदर्भात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी सनी वाघमारे, राहुल सोनवणे, नितीन गायकवाड यांनी मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन वरील मागणी करून चर्चा केली. दरम्यान, मंत्री रामदास आठवले म्हणाले की, याविषयावर बार्टी च्या संचालकांशी चर्चा करून संशोधक विद्यार्थ्यांचा हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले. यावेळी रिपाइं चे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे उपस्थित होते.