जालना: जालना शहरात सातत्याने वाढत जाणाऱ्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या वतीने शुक्रवारपासून तीन दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तीन दिवस शहरात कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला. मात्र, आज सोमवारी शहरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.
शहरात फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पायदळी तुडवत जालनेकरांनी शहरातील रस्त्यावर गर्दी केली होती. सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छतेचे नियम गुंडाळून ठेवून जालनेकर रस्त्यावर उतरले होते. शुक्रवारपासून तीन दिवस घरात राहिलेल्या जालनेकरांचा संयम आज सुटल्याचे दिसून आले. शहरातील सावरकर चौक, सुभाष रोड, टांगा स्टँड, जुना मोंढा, मामा चौक या शहरातील मध्यवर्ती भागात लोक मोठ्या संख्येने आल्याने कोरोनावर कशी मात करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
(सर्व छायाचित्रे: अनिल व्यवहारे)