प्रतिकात्मक छायाचित्र
पुणे: वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या 42 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आतापर्यंत कोरोनामुळे शहर पोलीस दलातील हा दुसरा मृत्यू झाला आहे.
कोरोना हॉटस्पॉट परिसरात असलेल्या वाहतूक विभागात ते काम करत होते. त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना चाचणीनंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी शहर पोलीस दलातील एका सहायक पोलिस फौजदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील 22 पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील अनेक जण बरे झाले आहेत.