# पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यूप्रकरणी पुण्यात निषेध आंदोलन.

पत्रकारांनी काळ्या फिती लावून काम करावे -पुणे श्रमिक पत्रकार संघाचे आवाहन

पुणे: आपले सहकारी पांडुरंग रायकर यांचा काल, 2 सप्टेंबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला जे जबाबदार आहेत त्या ढिसाळ राजकीय आणि प्रशासकीय घटकांचा ‘पुणे श्रमिक पत्रकार संघ’ निषेध करत आहे. रायकर यांना न्याय मिळेपर्यंत संघातर्फे टप्याटप्याने आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच पहिला भाग म्हणून आजपासून पुढील आठ दिवस पुण्यातील सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून काम करावे आणि आपला निषेध व्यक्त करावा, असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

संघातर्फे करण्यात आलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे:

१)रायकर यांच्या मृत्यूबाबत तत्काळ चौकशी करावी आणि मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांवर ताबडतोब कायदेशीर कारवाई करावी.

२)याशिवाय पांडुरंग यांना कोरोना योध्यांसाठी जाहीर केलेले 50 लाखांचे विमा कवचाचा लाभ मिळावा आणि ती मदत त्यांचा कुटुंबीयांना देण्यात यावी.

३)आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, जेणेकरून असे मृत्यू रोखले जातील.

या मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा आठ दिवसांनंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यासाठी प्रसंगी पत्रकार रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने करतील, असा इशारा संघाच्या वतीने राज्य सरकारला आणि इतर संबंधित यंत्रणांना पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *