# पुणे विभागातील 750 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज; विभागात कोरोनाबाधित 2734 रुग्ण.

 

पुणे: पुणे विभागातील 750 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 734 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 842 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 142 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 94 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 2 हजार 395 बाधित रुग्ण असून 680 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 587 आहे. कोरोनाबाधित एकूण 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 88 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्ह्यातील 113 कोरोनाबाधित रुग्ण असून 14 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 97 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 176 कोरोनाबाधित रुग्ण असून 24 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 142 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 35 कोरोनाबाधित रुग्ण असून 26 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 15 कोरोनाबाधित रुग्ण असून 6 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 27 हजार 429 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 26 हजार 301 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 186 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 23 हजार 509 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 2 हजार 734 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 82 लाख 12 हजार 122 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्याअंतर्गत 3 कोटी 26 लाख 74 हजार 234 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 956 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *