# अंबाजोगाईकरांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या राजकिशोर मोदींच्या सूचना.

कारखाना येथील जलशुद्धीकरण केंद्राची पहाणी

अंबाजोगाई: कारखाना येथील जलशुद्धीकरण केंद्रास गुरूवार, ८ एप्रिल रोजी भेट देऊन प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी त्या ठिकाणच्या जलशुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली. तसेच नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला अंबाजोगाईकरांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या.

अंबाजोगाई शहरातील नळास पिवळसर रंगाचे पाणी येत असल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात आल्यामुळे अंबानगरीचे प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी गुरूवारी अंबाजोगाई सहकारी कारखान्या नजीकच्या जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन त्या ठिकाणच्या जलशुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली. पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्याच्या योग्य त्या सूचना केल्या. अंबाजोगाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, कार्यालयीन अधीक्षक ए.जे.चव्हाण, नगररचनाकार अजय कस्तुरे यांनीही कारखाना येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन माहीती घेतली. प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदींनी भेट दिली असता त्यांचेसोबत सामाजिक कार्यकर्ते अनिसभाई अन्सारी, सामाजिक कार्यकर्ते सुनील व्यवहारे, नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभागातील अरूण कुरे, श्री. गोस्वामी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

अंबाजोगाई शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की,शहराला धनेगाव धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील काही दिवसांपासून अंबाजोगाई शहरात पिवळसर रंगाचे पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असून पाण्याचा रंग जाण्यासाठी तुरटीचे तसेच क्लोरीनचे प्रमाण ही वाढविण्यात आले आहे. शहरातील 1 ते 16 अशा विविध ठिकाणच्या पाण्याचे नमुने हे बीड येथील मुख्य अणुजीव शास्त्रज्ञ, जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा या शासकीय प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविले होते. त्या सर्व ठिकाणचे पाणी नमुने तपासणी नंतर सदरील पाणी हे पिण्यास योग्य असल्याचा अहवाल नगरपरिषदेला प्राप्त झाला आहे. शहरात ज्या-ज्या ठिकाणी पाणीपुरवठा होत आहे. तेथील नळाच्या पाण्याचे (ओ.टी. टेस्ट) तपासण्यात येत आहे. तसेच नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती दक्षता नगरपरिषद घेत आहे. नागरिकांना याद्यारे जाहीर सूचित करण्यात येते की, नगरपरिषदेकडून केला जाणारा पाणीपुरवठा पिण्यास योग्य आहे. याबाबत काही शंका अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे संपर्क करावा असे आवाहन मुख्याधिकारी, नगरपरिषद, अंबाजोगाई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *