# राज्यराणी एक्स्प्रेस 3 तर देवगिरी एक्स्प्रेस 5 डिसेंबर पासून धावणार.

नांदेड: राज्यराणी एक्स्प्रेस 3 डिसेंबर, तर देवगिरी एक्स्प्रेस 5 डिसेंबर पासून धावणार आहे. या दोन्ही गाड्या पूर्ण आरक्षित आहेत. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -19 संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.

1)गाडी संख्या 07611 नांदेड-मुंबई राज्यराणी विशेष गाडी 3 डिसेंबर रोजी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री 10.00 वाजता परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबई सीएसटी येथे सकाळी 10.07 वाजता पोहोचेल.

2)गाडी संख्या 07612 मुंबई-नांदेड राज्यराणी विशेष गाडी 4 डिसेंबर रोजी मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 06.45 वाजता सुटून मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे सकाळी 07.20 वाजता पोहोचेल. या गाडीस 17 डब्बे असतील.

3)गाडी संख्या 07058 सिकंदराबाद-नांदेड- मुंबई देवगिरी विशेष गाडी 5 डिसेंबर रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून दुपारी 01.25 वाजता सुटून नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबई सीएसटी येथे सकाळी 07.10 वाजता पोहोचेल.

4)गाडी संख्या 07057 मुंबई-नांदेड-सिकंदराबाद देवगिरी विशेष गाडी 6 डिसेंबर रोजी सीएसटी मुंबई रेल्वे स्थानकावरून रात्री 09.30 वाजता सुटून औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड मार्गे सिकंदराबाद येथे दुपारी 02.40 वाजता पोहोचेल. या गाडीस 21 डब्बे असतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *