# बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५० हजारापर्यंत -आरोग्यमंत्री राजेश टोपे.

 

मुंबई: राज्यात आज १५५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ३४६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५१ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ४१ हजार ४४१ नमुन्यांपैकी १ लाख ४ हजार ५६८ नमुने पॉझिटिव्ह (१६.३ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८३ हजार ३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५८० संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७९ हजार ७४ खाटा उपलब्ध असून, सध्या २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ११३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ८७ (मुंबई ६९, ठाणे ३, नवी मुंबई ८, पनवेल ६, कल्याण-डोंबिवली १), पुणे- १९ (पुणे १०, सोलापूर ८, सातारा १), औरंगाबाद-३ (औरंगाबाद३), लातूर -३ (लातूर २, नांदेड१), अकोला-१ (यवतमाळ१).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७३ पुरुष तर ४० महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६५ रुग्ण आहेत तर ३८ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १० जण ४० वर्षांखालील आहे. या ११३ रुग्णांपैकी १० रुग्णांच्या इतर अतिजोखमीच्या आजाराबद्दल माहिती उपलब्ध नाही. उर्वरित १०३ रुग्णांपैकी ८३ जणांमध्ये (८०.६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३८३० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ७३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २७ मे ते १० जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४० मृत्यूंपैकी मुंबई १९, नवी मुंबई -८, सोलापूर -४, ठाणे -३, पनवेल -३, कल्याण डोंबिवली – १, पुणे -१ आणि सातारा १ मृत्यू असे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *