# औरंगाबादकरांना दिलासा: दोन टप्प्यांत केवळ 51 रुग्णांची वाढ.

औरंगाबाद: जिल्ह्यातील 15 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. दरम्यान, सकाळी 36 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आज दुपारपर्यंत 51 रूग्णांची नोंद झाल्याने औरंगाबादकरांना कांही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.  त्यामुळे आतापर्यंत कारोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 10854 एवढी झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6141 एवढी आहे. आजपर्यंत एकूण 399 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4314 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

दुपारी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: औरंगाबाद शहरातील रुग्ण: (11)- स्वामी विवेकानंद नगर (1), सिडको एन 1 (1), दळवी चौक (2), रेल्वे स्टेशन परिसर (1), श्रीमंत गल्ली, धावणी मोहल्ला (1), वायएसके हॉस्पिटल परिसर (1), एन 12 (1), अन्य (3) या भागातील रुग्ण आहेत.

ग्रामीण भागातील रुग्ण:(4)- वैजापूर (3), कन्नड (1) या भागातील रुग्ण आहेत.

घाटीत 3 जणांचा मृत्यू:  आज घाटीमध्ये 3 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रामगोपाल नगरमधील 48 वर्षीय पुरुष, एन 7 सिडको मधील 52 वर्षीय पुरुष, बकापूर, पळशी येथील 45 वर्षीय स्त्री रुग्णांचा समावेश आहे.

सकाळी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: औरंगाबाद शहरातील रुग्ण (6)- जामा मस्जिद परिसर (1), लक्ष्मी नगर (2), देवगिरी कॉलनी (1), राजीव गांधी नगर (1), गुरूदत्त नगर गारखेडा (1), या भागातील रुग्ण आहेत.

ग्रामीण भागातील रुग्ण: (19)-  बकवाल नगर वाळूज (1),  पाचोड (1),  साबणे टॉकीज परिसर, गंगापूर (5), लासूर स्टेशन (1),  शिरसगांव (1), मेहबूब खेडा (1),  रेणुका नगर, अजिंठा (1),  आंबेडकर नगर, वैजापूर (1),  गोल्डन नगर वैजापूर (1),  एनएमसी कॉलनी वैजापूर (1),  वैजापूर (5) या भागातील रुग्ण आहेत.

चेक पोस्ट वरील रुग्णसंख्या: (11)- सुधाकर नगर (1),  मिटमिटा (3),  जाधववाडी (2),  सिध्दार्थ नगर (1),  हर्सूल (1),  बालाजी नगर (1), बजाजनगर (2),  या भागातील रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *