औरंगाबाद: राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 284 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका 2022 करिता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता परंतु सर्वोच्च न्यायालयातील दाखल विशेष अनुमती याचिका क्रमांक 19 756 /2021 मध्ये राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी झाली असून एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. या अनुषंगाने आयोगाचे 5 जुलै रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात येत आहे यासंदर्भात सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आरक्षण सोडत कार्यक्रम स्थगीत:
पुणे: जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रमाला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भातील सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम नंतर कळविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिल्हा नोडल अधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.