पुणे: आज दि. 29 जुलै 2022 रोजी येरवडा कारागृहाच्या मैदानावर झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत बाळासाहेब जालिंदर जाधव, तुरुंग अधिकारी श्रेणी 2, जालना कारागृह, यांची 4 ते 6 सप्टेंबर 2022 या कालावधीत अहमदाबाद, गुजरात येथे होणाऱ्या अखिल भारतीय कारागृह कर्मचारी क्रीडा स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघामध्ये हॉलीबॉल या खेळामध्ये निवड झाली आहे.
बाळासाहेब जाधव हे अखिल भारतीय कारागृह कर्मचारी क्रीडा स्पर्धेत यावेळी तब्बल सहाव्यांदा महाराष्ट्र संघातून खेळणार आहेत! म्हणून त्यांचे कारागृह कर्मचारी व गोंधळी तथा भटके विमुक्त समाजातील क्रिडाप्रेमींकडून कौतुक होत आहे.
अभिनंदन आण्णा

